जयवंत पाटील यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड - Saptahik Sandesh

जयवंत पाटील यांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पुणे येथील पिंपरी-चिंचवड या ठिकाणी पार पडलेल्या ऑल इंडिया राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये शितेकॉन कराटे असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थेचे मुख्य प्रशिक्षक नागनाथ बोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत पाटील यांची ऑल इंडिया एमएमए चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये शितेकॉन कराटे असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थेचे मुख्य प्रशिक्षक नागनाथ बोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत पाटील यांनी हे यश संपादित केले, त्याला संस्थेचे सर्व प्रशिक्षक विद्यार्थ्यांच्यावतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेला, करमाळा तालुक्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजय होण्यासाठी त्याचे प्रशिक्षक नागनाथ बोळगे हे त्याची तयारी करून घेण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

Yash collection karmala clothes shop
S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!