राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी लीड स्कुलच्या विद्यार्थ्यांची निवड - Saptahik Sandesh

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी लीड स्कुलच्या विद्यार्थ्यांची निवड

राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी व लीड स्कूलचे प्रा.श्री.झिंजाडे सर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय ज्युनियर मैदानी स्पर्धेचे आयोजन 23 जुलै व 24 जुलै रोजी एस आर पी एफ मैदान सोरेगाव, सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती, यात झालेल्या मैदानी स्पर्धेत लीड स्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

याठिकाणी झालेल्या मैदानी स्पर्धेत लीड स्कुलचे विद्यार्थी 1.सिद्धार्थ मंजुळे , (80मी अडथळा, पहिला क्रमांक) 2.ईशायू क्षीरसागर (high जंप, पहिला क्रमांक ) 3.रितेश लोंढे (भालाफेक, तिसरा क्रमांक) मिळवला असुन या सर्वांचे राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याप्रसंगी लीड स्कुलचे प्राचार्य अतिष क्षीरसागर यांनी सहभागी झालेल्या व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व राज्यस्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अंकुश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

S.K. collection bhigwan
Yash collection karmala clothes shop
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!