जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा संघ तृतीय
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : १० डिसेंबर रोजी अकलूज येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुलांच्या संघानी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातुन तालुकास्तरीय स्पर्धेतून विजयी झालेला एक संघ सहभागी झाला होता. करमाळा येथील स्पर्धेतुन महात्मा गांधी विद्यालयाचा संघ तालुकास्तरावर जिंकून या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
महात्मा गांधी विद्यालयाच्या संघात यशराज कोरे (कर्णधार), कल्पेश कोरपे,(उपकर्णधार), मैत्रेय अब्दुले, शुभम चव्हाण,हर्षद चेंडके,रुद्र भालेराव,सिद्धांत फलफले,सार्थक रंधवे,अवधुत नाळे,सक्षम दळवी,स्वरूप काळे,यश दळवे,रिहान बागवान,विश्वजित सरडे,जयराज दळवे या खेळाडूंचा सहभाग होता.
या संघाला विद्यालयाचे क्रिडा शिक्षक सचिन दळवे,महेश कांबळे,साखरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. धारूरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सर्व यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शकांचे, संस्थेचे चेअरमन माजी आमदार जयवंतराव जगताप, संस्थेचे विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त किंग्ज गृप संस्थापक शंभूराजे जगताप मुख्याध्यापक पी.ए.कापले सर,उपमुख्याध्यापक बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक श्री शिंदे सर, पर्यवेक्षक श्री पाटील सर, संस्थेचे सचिव श्री तरकसे सर यांनी अभिनंदन केले.