राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कविटगाव येथील पै.यश सरडेची निवड
कंदर / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रोहतक (हरियाणा ) येथे 24 ऑगस्ट रोजी 15 वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्तीस्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्ती संघामध्ये कविटगाव (ता.करमाळा) येथील पै. यश शिवाजी सरडे यांची निवड झाली.
महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा 14 ऑगस्ट ला सह्याद्री कुस्ती संकुल , वारजे पुणे येथे नुकतीच संपन्न झाली, यश सरडे हा कविटगाव येथील पै.शिवाजीकाका सरडे यांचा मुलगा आहे. पै.अमोल बुचडे कुस्ती संकुल पुणे येथे रुस्तुम हिंद पै.अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली यश सरडे हा सराव करत आहे.
यश सरडेच्या निवडीबद्दल माजी आमदार पै.नारायण (आबा )पाटील, मुंबई महापौर पै. विजय(दादा) गुटाळ,चिखलठाणचे सरपंच चंदुकाका सरडे, डबल महाराष्ट्र केसरी पै.अतुल (भाऊ) पाटील, मकाई सा.का.चेअरमन बागल,महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहास (बापू) निमगिरे अक्षय शिंदे ग्रामपंचायत सदस्य कविटगाव आदी कविटगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.