शेटफळ येथील तरूणांचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रमदानातून वृक्षलागवड उपक्रम - Saptahik Sandesh

शेटफळ येथील तरूणांचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रमदानातून वृक्षलागवड उपक्रम

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ येथे गावातील तरूणांनी लोकवर्गणी करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला सोळा प्रकारच्या सत्तर वृक्षांची लागवड आज केली.गावातील तरूणांनी एकत्र येऊन श्रमदानातून ही वृक्षलागवड केली असुन यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहीम सर्वत्र सुरू असताना याबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी शेटफळ येथील तरुणांई सरसावली असून गावातील प्राथमिक शाळेची नवीन इमारत बांधल्यानंतर शाळेच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी शाळा सुशोभीकरण करण्यात येत आहे यासाठी गावातील तरूणांनी सरपंच विकास गुंड उपसरपंच आजित नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तरूणांनी लोकवर्गणी जमा करून सोळा प्रकारच्या सत्तर वृक्षांच्या मोठ्या रोपांची नर्सरीतून खरेदी करून श्रमदानातून शाळेच्या आवारात लागवड केली व त्याच्या पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.

यावेळी सरपंच विकास गुंड, उपसरपंच आजित नाईकनवरे,सुहास पोळ, विठ्ठल गुंड, प्रशांत नाईकनवरे, बाबुराव नाईकनवरे,चेतन पोळ,सागर पोळ, गजेंद्र पोळ, संदीप पोळ, अक्षय गुंड, रणजित लबडे, विशाल पोळ, शहाजी रोंगे धनाजी गायकवाड, नागनाथ पोळ, नवनाथ गुटाळ, हरिश्चंद्र गुंड नागनाथ नलवडे, योगेश घोगरे यांच्यासह गावातील तरूणांनी श्रमदानातून वृक्षलागवड मोहीमेत सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!