गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात विविध उपक्रम राबवून 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गौंडरे (ता.करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात विविध उपक्रम राबवून मोठ्या थाटात 75 वा अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, जनरल नॉलेज परीक्षा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबवून सपन्न झाला.

या कार्यक्रमाला परिसरातील आजी-माजी सैनिकांना आमंत्रित करून त्यांचा आदर सत्कार करून सन्मान करण्यात आला.यावेळी शिवनाद सांस्कृतिक कला मंच गौंडरे संस्थापक विजयजी खंडागळे यांच्या ग्रुपकडुन प्रत्येक वर्गातील एक (आर्थिक परिस्थितीने अतिशय गरिब असणारा) मुलगा दक्तक घेऊन त्यांचा वार्षिक सर्व खर्च ग्रुपने उचलला आहे. यावेळी दत्तकृपा कंट्रक्शन चे मालक भरत भाऊ अवताडे व माजी सभापती पंचायत समिती करमाळा शेखर तात्या गाडे, माजी सैनिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुकाराम चव्हान, तसेच परिसरातील जवळजवळ 25 आजी माझी सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर डान्स तसेच गायन करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे सचिव हरिदास काळे व संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक बापू निळ त्याचप्रमाणे उत्तम हनपुडे यांनी सत्कार केला तर सूत्रसंचालन श्री.गिलबिले केले कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतला तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित होते संगीत विशारद विजय खंडागळे. सर्पमित्र माधव हनपुडे. गौंडरे गावचे सरपंच सुभाष पाटील, चंद्रकात नाना अंबारे माजी सरपंच अजिनाथ सपकाळ .वसंत अंबारे. अण्णा सपकाळ.तसेच बरेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!