"समाधान संपत्तीत नव्हे तर विचारात असतं" – डॉ. सुरेश शिंदे - Saptahik Sandesh

“समाधान संपत्तीत नव्हे तर विचारात असतं” – डॉ. सुरेश शिंदे

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : “समाधान हे पैशातून, संपत्तीतून किंवा संततीतून मिळत नाही; ते विचारातून मिळतं. आपण कोणता विचार करतो आणि त्याचे कृतीतून काय फलित मिळते, त्यावर जीवनातील समाधान अवलंबून असते,” असे मत ज्येष्ठ कवी प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले.

ते ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ॲड. बाबुराव हिरडे होते. डॉ.शिंदे पुढे म्हणाले, “प्रकाश लावंड यांनी शेती, माती आणि शेतकरी या विषयांवर केलेलं काव्य हे त्यांचं वैचारिक समृद्धीचं द्योतक आहे. त्यांच्या कविता केवळ आनंद देणाऱ्या नाहीत, तर वाचकांना दिशा, दिलासा आणि अंतर्मुख करणारी ऊर्जा देतात. कार्बनसारख्या कवितांनी त्यांनी सामाजिक भान जपलेलं आहे.”

कार्यक्रमाच्या मंचावर डॉ. महेंद्र नगरे, डॉ. सुनीता जोशी, उद्योजक भारत वांगडे, सेवानिवृत्त वित्त अधिकारी गौतम जगदाळे, माजी कुलसचिव संभाजीराव देसाई, , यश कल्याणी परिवाराचे संस्थापक गणेश करे पाटील, प्रा. शिवाजीराव बंडगर, ग्राम सुधार समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे, खजिनदार राजेंद्र रणसिंग साहित्यिक भिष्माचार्य चांदणेआदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात कवी संमेलन सुद्धा झाले. कवी खलील शेख यांच्या नियोजनातून झालेल्या या सत्रात कवी तेजेस ढेरे, कवी नारायण सोरटे, मारुती साखरे, कवयित्री मंजिरी जोशी, प्रणिता काटोळे यांनी आपल्या कवितांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी दिगंबर साळुंखे, अनिल माने, सचिन साखरे, डॉ. जयंत कापडी, एन. डी. सुरवसे, महादेव भोसले, मोरेश्वर पवार, अॅड. बिभीषण सोरटे, दिग्विजय देशमुख, बाळासाहेब गोरे, संतोष माने, बाळासाहेब दुधे, राजेंद्र काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कवी प्रकाश लावंड यांनी आपल्या सत्काराला उत्तर देत भावनिक प्रतिसाद दिला तर अध्यक्षीय भाषणातून अॅड. बाबुराव हिरडे यांनी प्रकाश लावंड यांच्या सर्जनशीलतेचं व सामाजिक भानाचं मोठ्या सन्मानाने वर्णन केलं. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी कवी लावंड यांचा सत्कार करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नागेश माने यांनी केले तर उत्तम सूत्रसंचालन गझलकार नवनाथ खरात यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!