करमाळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपली असून या ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. तालुक्यातील चिखलठाण, जेऊर, राजुरी, कंदर, कोर्टी, केत्तूर, वीट, घोटी, भगतवाडी, गौंडरे, उंदरगाव, निंभोरे, रामवाडी या १३ ग्रामपंचायतीवर मुदत संपल्याने प्रशासक नेमण्यात आले आहेत.
या १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कालावधी संपल्याने जिल्हा परिषदेने या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. या सर्व गावामधील निवडणूका मे किंवा जून महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या १३ ग्रामपंचायती पैकी जेऊर, चिखलठाण, कंदर, कोर्टी, केत्तूर, वीट, निंभोरे, घोटी या ग्रामपंचायती मोठ्या असून या ठिकाणी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी ग्रामपंचायत जेऊर ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.