‘करमाळा महावितरण’चा शंभर टक्के वीज बिल वसुलीत ‘जिल्ह्यात पाचवा क्रमांक’..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘करमाळा महावितरण’चा शंभर टक्के वीज बिल वसुलीत ‘जिल्ह्यात पाचवा क्रमांक’ आल्याबद्दल पोथरे (ता.करमाळा) येथील आनंदी लॉन्स येथे गुणगौरव सोहळा महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सर्व सहकुटुंबा सोबत साजरा करण्यात आला.
करमाळा वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र ड्युटी बजावत ग्रामीण तसेच शहरी भागातील घरगुती व शेतीचे महावितरण कंपनीने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट १००% पेक्षा जास्त पार पडल्यामुळे करमाळा उपविभागीय अधिकारी एस.व्ही.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार समीर माने होते. यावेळी अधीक्षक अभियंता, श्री सांगळे, कार्यकारी अभियंता श्री कुऱ्हाडे. पोलिस निरीक्षक श्री. गुंजवटे, पोलिस अधिकारी श्री भुजबळ, श्री पवार,श्री शिंदे, श्री वाघमारे, श्री ढेरे आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे येथील पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते, सोबतच स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते, यावेळी थकबाकी वसुली झीरो केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले एकूण अठरा कर्मचाऱ्यांना सत्कार आणि सर्व अधिकारी ऑपरेटर वायरमन सुरक्षा रक्षक यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुराणिक, श्री कट्टी यांनी केले होते आभार प्रशांत गाठे यांनी मानले.
