यात्रेत का नाचत नाही म्हणून तरूणास बेदम मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : यात्रेत नाचावयास चल.. असे म्हणूनही नाचावयास न आलेल्या तरूणास बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणाची तक्रार दिल्यानंतर दोघा जणांनी त्या तरूणास जातीवाचक शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी दोघांविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकीकत अशी कि, जबरदस्तीने घेवून जाताना तरूण नाचावयास आला नाही म्हणून त्यास जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा प्रकार भाळवणी, ता. करमाळा येथे १२ एप्रिलला पहाटे साडेचार वाजता घडला आहे. यात अजिंक्य ज्ञानदेव शिंदे (भाळवणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की.. भाळवणी येथे ११ एप्रिलला रात्री छबीना निघाला होता. १२ एप्रिलला पहाटे साडेचार वाजता राहूल फरतडे हा मला नाचावयास चल असे म्हणाला. परंतू मी नाचावयास गेलो नाही म्हणून त्याने लाथाबक्कांनी मारहाण केली. तसेच तु तक्रार का दिली.. असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून त्याने व त्याचा भाऊ तानाजी बाळू फरतडे अशा दोघांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोघाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रविण साने हे करत आहेत.
