शेतकऱ्यांची ऊस बिले ‘मे’ महिनाअखेर मिळणार या आश्वासनानंतर राजाभाऊ कदम यांचा मोर्चा अखेर रद्द..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतकऱ्यांची ऊस बिले ‘मे’ महिनाअखेर काढण्याचे कारखान्याने लेखी पत्र दिले असून, या आश्वासनानंतर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय 19 मे घेतला होता तो मोर्चा अखेर रद्द करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी 18 मे रोजी तहसीलदार विजयकुमार जाधव, मकाईचे कार्यकारी संचालक खाटमोडे, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांची पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेतली. पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्याशी ऊस बिलाबाबत चर्चा केली, अखेर दिग्विजय बागल यांनी कार्यकारी संचालक खाटमोडे यांच्या मार्फत बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना लेखी पत्र दिले ऊस बिले व वाहतूक बिले मे अखेर 2023 पर्यंत देणार असे लेखी आश्वासन दिल्याने 19 तारखेचा मोर्चा रद्द करण्यात यावा असे लेखी निवेदन दिले. तसेच मे अखेरपर्यंत ऊस बिले व वाहतूक बिले नाही दिल्यास जून महिन्यामध्ये 1 तारखेला मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या घरावर पुन्हा मोर्चा काढण्यात येईल, याप्रसंगी अशी घोषणा राजाभाऊ कदम, दत्तू आबा गव्हाणे, संदीप मारकड, निलेश पडवळे, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.