आमदार संजयमामा शिंदे यांची कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड - Saptahik Sandesh

आमदार संजयमामा शिंदे यांची कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

करमाळा : करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांची कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. मंगळवारी (दि. १६) सभापतिपदासाठी संजयमामा शिंदे व उपसभापतीपदासाठी सुहास पाटील जामगावकर यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने शिंदे व जामगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांनी जाहीर केले.

यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी नूतन पदाधिकारी व संचालकांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन संचालक उत्कर्ष देशमुख, रमेश पाटील, शिवाजी पाटील,हनुमंत पाडुळे, दिलिप भोसले, निकिता खटके, सुमन मोरे, अमोल देवकर, सुरेश बागल, संतोष अनभुले, पोपटलाल दोभाडा, सतिश सुर्वे, नागनाथ पाटील, डॉ.विजयकुमार लोंढे, किसन पाटील व
रामभाऊ वाघमारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!