कंदर येथे छ.संभाजी महाराज जयंती निमित्त कुस्त्यांचे आयोजन - Saptahik Sandesh

कंदर येथे छ.संभाजी महाराज जयंती निमित्त कुस्त्यांचे आयोजन

कंदर प्रतिनिधी /संदीप कांबळे..

करमाळा : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कंदर तालुका करमाळा येथे मंगळवार दिनांक 23 मे रोजी दुपारी तीन वाजता भव्य निकाली कुस्ती फडाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक पैलवान उमेश इंगळे यांनी दिली.

या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय मामा शिंदे यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे निमगाव चे सरपंच यशवंत शिंदे यांचे सह करमाळा विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक मोनाली पवार आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिवरत्न तरूण मंडळ यांचे तर्फे दोन लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात होणार आहे. उपळवाट्याचे उपसरपंच महेश देवडकर यांच्यातर्फे एक लाख रुपयाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन प्रसाद सस्ते यांच्यात होणार आहे. भैरवनाथ लोकरे यांच्यातर्फे 75 हजार रुपयाची कुस्ती प्रशांत जगताप विरुद्ध मनोज माने यांच्यात होणार आहे.

राजे उमाजी राजे नाईक मित्र मंडळ तांबवे यांचे तर्फे 51 हजार रुपयाची कुस्ती पैलवान अमित जगदाळे विरुद्ध प्रतीक कदम यांच्यात होणार आहे. उद्योगपती बालाजी शिरसकर यांच्यातर्फे 41 हजार रुपयाची कुस्ती भैया धुमाळ विरुद्ध ऋषिकेश काळे यांचे त होणार आहे. अतुल केदार व वैभव केदार यांच्यातर्फे 31 हजार रुपयाची कुस्ती व औकांर ढुके विरुद्ध अभिजीत सोनवणे यांच्यात होणार आहे. अमोल यादव यांची तर्फे 31 हजार रुपयाची कुस्ती हनुमंत काळे विरुद्ध दीपक पाडुळे यांच्यात होणार आहे. अण्णा गोसावी यांच्यातर्फे 31 हजार रुपयाची कुस्ती सुनील नवले विरुद्ध परमेश्वर गाडे यांच्यात होणार आहे. याशिवाय अनेक कुस्त्या होणार आहेत..तरी या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!