विद्यार्थ्यांची प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी – ‘डॉ एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन’ची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगतीसाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते . केंद्र सरकारच्या 29 नोव्हेंबर 2022 च्या निर्णयानुसार गतवर्षी पासुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद झाली आहे. त्यामुळे बंद झालेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा ही केंद्र शासन व महाराष्ट्र शासनास आवाहन करत आहे.
याआधी अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम,शीख,जैन, बौद्ध, पारसी, समाजातील शासकीय व निमशासकीय खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील 7 लाख 34 हजार 819 विद्यार्थ्यांना 81 कोटी 65 लाख रुपये मिळत होते. शिष्यवृत्ती बंद झाली असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे
पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा त्यामागे उद्देश होता, मात्र गतवर्षी पासुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. अनेक अल्पसंख्याक विद्यार्थ्यी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहे परंतु पहिली ते आठवीपर्यंत बंद झाल्याचा सर्वाधिक फटका उर्दू माध्यमाच्या शाळांना बसला आहे शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत व उपस्थित वाढ झाली होती. असे कलाम फाऊंडेशनचे मत आहे, त्यामुळे बंद झालेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.