करमाळा येथील कुटीर रुग्णालय प्रशासनाविरोधात रिपाईने केले आंदोलन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना सामोरे जाव्या लागणाऱ्या असुविधेबद्दल तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या गलथानपणावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपाई (आठवले) चे यूवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१५ सप्टेंबर) तहसील कार्यालयात हलगीनाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक उत्सफूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी यशपाल कांबळे यांनी उदागे नावाच्या एका महिलेच्या प्रसूतीवेळी रक्ताचे रिपोर्ट अन खाजगी रुग्णालयातील रिपोर्ट यात प्रचंड तफावत दिसून आली व सिझेरियनची शक्यता सांगितलेली असताना चक्क नॉर्मल डिलिव्हरी झाली. या संदर्भात निवेदने देऊन कारवाई ची मागणी केली असता कसलाही प्रतिसाद न आल्याने आज आंदोलन करण्यात आले असल्याचे यशपाल कांबळे यांनी सांगितले.
राजकीय वरदहस्त असल्याने संबंधित अधिकारी असे वागत असल्याचे प्रतिपादन पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी व्यक्त केले. अधिका-यांना पाठिशी घालणा-या राजकीय नेतृत्वाचा देखील पर्दाफाश केला जाईल असे आव्हान देखील यावेळी आंदोलकांकडून करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने उत्तर दिल्याशिवाय इथून हलणार नसल्याची ठाम भूमिका यशपाल कांबळे यांनी घेतली असता तहसिलदार विजय कुमार जाधव यांनी रुग्णालय प्रशासनाच्या प्रतिनिधी व आरोग्य अधिकारी श्रद्धा भोंडवे यांना आंदोलनकर्त्यांना कारवाई ची माहिती देण्यास सांगितले. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी सतिश भोसले,सूहास ओहोळ, मराठा सेवा संघाचे नितीन खटके,बहुजन संघर्ष सेने चे राजाभाऊ कदम,नितिन दामोदरे, प्रफुल्ल दामोदरे, मातंग एकता आंदोलन चे युवराज जगताप. मीना भोसले यांची भाषणे झाली यावेळी प्रसेंजित कांबळे मयूर कांबळे अमोल गायकवाड सचिन गायकवाड धनराज सरोदे. शरद पवार. रंजीत कांबळे. किशोर कांबळे सुगत कांबळे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते