करमाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने रविवारी जेऊर-करमाळा-चोंडी अशी भव्य मोटारसायकल रॅली - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने रविवारी जेऊर-करमाळा-चोंडी अशी भव्य मोटारसायकल रॅली

करमाळा(संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने येत्या रविवारी (दि.१७ सप्टेंबर) करमाळा ते चौंडी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीची सुरवात जेऊर बाजार तळ येथून सकाळी ९:०० वाजता तर करमाळा कुटीर रुग्णालया जवळील दत्त मंदिर येथून सकाळी ९:३० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ होणार आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, चोंडी (ता.जामखेड) येथे धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी उपोषणास यशवंत सेनेचे धनगर समाज बांधव गेले आठ दिवसापासून बसलेले आहेत. सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही. त्यांची दिवसेंदिवस तब्येत ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना पाठींबा देण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती रॅली आयोजकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!