कव्हे येथे जबरी चोरी-पाच लाखाचा माल लंपास - Saptahik Sandesh

कव्हे येथे जबरी चोरी-पाच लाखाचा माल लंपास

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – माढा तालुक्यातील कव्हे येथे बुधवारी (दि.१३ सप्टेंबर) रात्री प्रबोधनकार ठाकरे विद्यालया शेजारील महावीर माळी यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने सह रोख रक्कम मिळून एकूण ४ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्दा माल लंपास केला आहे.

तीन चोरट्यांनी मारहाण करून जबरी चोरी केली या बाबतची फिर्याद कव्हे तालुका माढा येथील रतन महावीर माळी यां महिलेने कुडूंवाडी पोलीसात दाखल केली त्या मध्ये म्हटले आहे की कव्हे येथील बिटरगाव पालखी मार्गावरील जाणाऱ्या रोडच्या शाळेजवळ माझे घर आहे माझे पती बुधवारी रात्री बाहेर झोपले होते रात्री ३:१५ च्या सुमारास दरवाजा तोडण्याच्या आवाजाने रतन माळी जाग्या झाल्या दरम्यान तिघांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी रतन यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील फुल काढून घेतल्यानंतर लाकडी दांडके चाकू,कटावणी,याचा दाख दाखवून रतन च्या डाव्या पायाच्या मांडिवर मारहाण करून कपाटाची चावी घेतली बैलजोडी घेण्यासाठी कपाटात ठेवलेले १लाख९५हजार रू रोख काढून घेतले या वेळेस या महिलेने विरोध करताच मारहाण केली य या मध्ये ३५हजार किमतीचे सोन्याचे मणी व २सोन्याच्या वाट्या असलेलें सोन्याचे गंठण ७० हजार किंमतीचे २तोळे कानातील सोने पटी गंठण तसेच १ लाख ४०हजार रूपये किमतीच्या ४ तोळे वजनाच्या पटिच्या सह सोन्याच्या बांगड्या व ७ हजार किमतीचे २ ग्रम वजनाचे कानातील सोन्याच्या काड्या असे मिळून ४ लाख४७ हजार रूपयांचा माल. लंपास केला या बाबत कुडूंवाडी पोलीसात अज्ञात चोरट्यां विरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!