अर्जुननगर येथे जुगार खेळणाऱ्यां विरोधात पोलिसांची कारवाई - Saptahik Sandesh

अर्जुननगर येथे जुगार खेळणाऱ्यां विरोधात पोलिसांची कारवाई

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर मध्ये खुलेआम जुगार खेळताना पोलिसांनी ६ जणांना पकडले आहे. पोलिस कॉन्स्टेबल तौफीक रज्जाक काझी यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. १० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस नाईक ढवळे, पोलिस कॉन्स्टेबल जगताप व पोलिस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या सह पेट्रोलिंग करत असताना खबऱ्या मार्फत आम्हाला अर्जुन नगर (ता. करमाळा) येथील मारूती
मंदीराच्यासमोर काही इसम 52 पत्यांचा डाव खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर दुपारी दीड वाजता छापा घालण्यासासाठी आम्ही दोन पंचांसह त्या ठिकाणी गेलो असता तेथे काही इसम वर्तुळाकार बसुन पत्याच्या डावावर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसले.

पकडलेल्या इसमांना आम्ही दोन पंचासमक्ष त्यांचे नाव व पत्ताविचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अविनाश रामदास थोरात वय 41 रा. अर्जुननगर ताकरमाळा 2) येताळा भिवा पवार वय 30 रा अर्जुननगर ता करमाळा 3) बबन नारायण दौंडे वय 69 रा.फिसरे,ता.करमाळा 4) शशीकांत मगन थोरात वय 56 रा. अर्जुननगर ता करमाळा 5) शंकर दगडु पवार वय 52 रा अर्जुन नगर ता करमाळा 6) संजय विठठल थोरात वय 49 रा. अर्जुननगर जि.सोलापुर असे सर्वजण 52 पत्याचे पानावर पैसे लावुन मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले. पकडलेल्या इसमांकडे जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम, १५५० रुपये मिळून आले. या सर्वांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!