हमाल-तोलार मतदार संघातून वालचंद रोडगे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा - Saptahik Sandesh

हमाल-तोलार मतदार संघातून वालचंद रोडगे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२३ च्या पंचवार्षिक निवडणुक मध्ये हमाल तोलार मतदार संघातुन वालचंद रोडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने तो अर्ज छाननी मध्ये मंजूर झालेला आहे. त्यांची बिनविरोध संचालक पदी निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. वालचंद रोडगे हे सलग दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून येतील.

‌‌हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत गटाचे वालचंद रोडगे यांना हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी त्यांचे काम पाहुन दुसरे वेळी कृ उ बा समितीची उमेदवारी दिली व रोडगे यांना बिनविरोध निवडुन आणुन संचालक पदावर काम करण्याची संधी दिली. स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या विचाराने चालणारी हमाल पंचायत मध्ये आज पर्यंत एक विचाराने हमाल प्रतिनिधी म्हणुन कृ उ बा समिती वर संचालक म्हणुन पाठविण्याची पंरपरा असुन हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांच्या काळात ही चालु असुन आज दुसरे वेळी वालचंद रोडगे हे बिनविरोध संचालक झाले हे उत्कृष्ट संघटनाचे यश आहे. हमाल पंचायत युनियनच्या एकीचा हा विजय आहे असे मत रोडगे यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी ॲड. राहुल सावंत व नुतन संचालक वालचंद रोडगे यांचे अभिनंदन केले.
सदर निवडीची घोषणा होताच सर्व हमाल बांधव सावंत गटाच्या कार्यकर्ते नी पेढे वाटुन व फटाके फोडुन शहरात जल्लोष केला. यावेळी सर्व हमाल तोलारांचे व ज्ञात अज्ञात सर्व नेते मंडळी चे हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड . राहुल सावंत यांनी आभार व्यक्त केले . चौकट

कामगार नेते संस्थापक स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या आर्शिवादाने हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी मला दुसऱ्यांदा बिनविरोध संचालक पदी संधी दिली तसेच माझे सहकारी हमाल – तोलार यांच्या एकजुटीचा हा विजय आहे . यापुढेही हमाल – तोलार यांच्या न्याय्य हक्क व अधिकार बाबतीत कोणतीही तडजोड न करता त्यांच्या हितासाठी अधिक जोमाने प्रयत्न करणार आहे.

वालचंद रोडगे,नूतन संचालक, बाजार समिती करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!