भारतीय सैन्य दलात ग्रामीण भागातील युवकांना देशसेवेबरोबरच करिअरची मोठी संधी : सुभेदार मेजर विलास नाईकनवरे
करमाळा / संदेश प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलात ग्रामीण भागातील युवकांना देशसेवेबरोबरच करिअरची मोठी संधी उपलब्ध असून यासंबंधी माहिती घेऊन क्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुभेदार मेजर विलास नाईक नवरे यांनी जेऊर वाडी तालुका करमाळा येथे योद्धा करिअर मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित दहावी बारावी नंतर काय या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करियर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेऊरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अण्णासाहेब निमगिरे होते. पुढे बोलताना सुभेदार मेजर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार साध्या सैनिका असते क्लासवन अधिकारी पर्यंतच्या संधी भारतीय सैन्य दलात उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ते कौशल्य ही आहे तर त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे पालकांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे व्यक्त केले.
यावेळी भारत महाविद्यालयाचे प्राध्यापक अरविंद दळवी यांनी दहावी बारावीनंतर कोणत्याही क्षेत्रांमध्ये विद्यार्थी आपले करिअर घडू शकतो परंतु त्या क्षेत्रामध्ये जिद्द आणि चिकाटीने परिश्रम करण्याची गरज आहे यावेळी बोलताना आयटी क्षेत्रातील तज्ञ तुषार सरडे यांनी दहावीला कमी गुण मिळणे मिळाले म्हणून नाराज न होता विद्यार्थ्यांनी नवीन क्षेत्रामध्ये संधी शोधल्या पाहिजेत, यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे यावेळी राज्य हँडबॉल असोसिएशनचे विनोद गरड यांनी खेळातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, कोणतेही शेत्र निवडले तरी व्यायाम आणि खेळाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड होऊन महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळवलेल्या महेश चोरमले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी या क्षेत्रात आपण कशासाठी जाणार आहोत हे आधी मनात निश्चित केले पाहिजे आणि त्यानुसार तयारी केल्यास या क्षेत्रामध्ये ही करिअरच्या उत्तम संधी आहेत अशी माहिती डॉ.सिद्धार्थ पोळ यांनी यावेळी बोलताना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले. सुरवातीला उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक नवरे यांनी केले. या कार्यक्रमाला जेऊरवाडी येथील सरपंच अण्णासाहेब निमगिरे,भारत महाविद्यालयाचे प्रा.अरविंद दळवी शेटफळचे माजी सरपंच मुरलीधर पोळ, पांडुरंग नाईकनवरे, राजेंद्र पोळ, विनोद गरड महेश तोरमल तुषार सरडे यांच्यासह या परिसरातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.