बहूजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा.. - Saptahik Sandesh

बहूजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने करमाळा येथे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित तालुक्यातील विविध माध्य. उच्च. माध्य विद्यालयातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी ताईंचा कार्यगौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज राऊत हे होते, याप्रसंगी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेशभाऊ करे-पाटील, डॉ.ॲड.बाबुराव हिरडे, डॉ.निलेश मोटे, सुभेदार मेजर विलास नाईकनवरे, प्रकाश आरडे संपादक स्वराज न्युज इंदापूर, अशोक सोनकांबळे 24 न्यूज चैनल चे संपादक इंदापूर, आतकर, पर्वत, देशपांडे, सुजित बागल, संदिप शिंदे, कल्याणराव सांळुके आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मौलीक मार्गदर्शन केले. प्रा.करे-पाटील, ॲड.हिरडे, मनोज राऊत,पोलिस निरीक्षक श्री.घुगे या सर्वांनी आपली मनोगत व्यक्त केले.

बहूजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे या गेली तीन वर्षापासून अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत त्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. बहूजन मराठी पत्रकार संघाने या कार्यक्रमाचे नेटके व सुंदर आयोजन केले होते. विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या मान्यवरांना एकाच व्यासपिठावर आणण्याची किमया पत्रकार संघाने साधली. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही अनोखी वैचारीक मेजवाणीच ठरली.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष योगदान देणारे ,बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा मधील सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्षा मा. आशाताई चांदणे, बाळासाहेब भिसे जिल्हा उपाध्यक्ष, आबासाहेब झिंजाडे, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, जिल्हा उपाध्यक्षा प्रमोद खराडे,तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंदे तालुका उपाध्यक्ष,,मा. संभाजी शिंदे तालुका कार्याध्यक्ष संजय चांदणे, तालुका सदस्य, सचिन नवले, श्रींमत दिवटे, तालुका सदस्य, मा. माधुरी कुंभार, तालुका सदस्या सौ. सुवर्णा निंबाळकर, तालुका सदस्या मा. हिराबाई देमुंडे तालुका सदस्या ,व संपूर्ण पत्रकार संघाचे विशेष कौतुक केले , पत्रकार संघ, व सर्व पदाधिकारी यांना पत्रकारिता व समाजसेवेस पुढील कार्यास सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब भिसे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाची सांगता आभार दादासाहेब शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!