करमाळा तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांसाठी 'मोदी आवास' योजनेतून घरकुल मंजूर करण्याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी… - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांसाठी ‘मोदी आवास’ योजनेतून घरकुल मंजूर करण्याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी…


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत OBC, SBC, NT प्रवर्गातील 5035 घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी आहे. यापैकी आतापर्यंत मोदी आवास योजनेतून OBC, SBC च्या 540 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे.

NT प्रवर्गाला अजूनही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जवळपास 3000 च्या आसपास NT प्रवर्गातील लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित आहेत.त्यामुळे OBC, SBC, NT प्रवर्गातील वंचित लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्याची मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे, पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सोलापूरचे प्रकल्प संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


आमदार शिंदे यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की,मंजूर लाभार्थीपैकी 4495 लाभार्थी अजूनही मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलांपासून वंचित आहेत. त्याबरोबरच जिल्हा निवड समिती अंतर्गतही जवळपास 4000 लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहेत .यामुळे करमाळा तालुक्यासाठी मोदी आवास योजनेअंतर्गत 9000 घरकुलाचे वाढीव टार्गेट मंजूर करून मिळावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!