करमाळा येथील लोकन्यायालयात १६० प्रकरणे तडजोडीने निकाली..
करमाळा : करमाळा येथील न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात एकुण १६० खटले तडजोडीने मिटले असून, यामध्ये रक्कम रुपये २,८९,८४,७२ / – वसुली झाली आहे.
करमाळा न्यायालयात २८ सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर व दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यु.पी. देवर्षी व तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा एम.पी. एखे यांचे मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पॅनल प्रमुखपदी न्यायाधीश एम.पी.एखे तसेच न्यायाधीश बी.ए.भोसले हे होते. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या लोकन्यायालयामध्ये प्रलंबीत २१६७ प्रकरणापैकी दिवाणी व फौजदारी प्रकरणे ८३ निकाली झाले असुन,त्यामध्ये २,५७,५४,२०० /- रुपयाची रक्कम वसुली झाली असुन तसेच दाखलपूर्व २०११ प्रकरणापैकी तडजोडीने नगर पालिका व बॅक कर्ज वसुली प्रकरणे ७७ तडजोडीने मिटलेली आहेत. त्यामध्ये रक्कम रुपये ३२,२९,८७२ /- वसुल झाली आहे. याप्रसंगी लोकअदालतमधील प्रकरणात काही वयोवृद्ध व्यक्ती पक्षकार आलेले होते, ज्यांना न्यायालय कक्षात येणे कठीण होते, याप्रसंगी न्यायाधीश एम.पी.एखे यांनी स्वतः न्यायालय आवारात जावून सदर व्यक्तीना न्याय मिळेल या भावनेने प्रकरण निकाली काढले.
पॅनल प्रतिनिधी म्हणून ॲड. आमृळे व श्रीमती एस.ई. मुजावर यांनी काम पाहिले. यावेळी न्यायाधीश एम.पी.एखे व न्यायाधीश बी. ए. भोसले आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.ए.बरडे यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी कोर्ट क्लार्क रामेश्वर खराडे यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी करमाळा बार असोसिएशनचे सदस्य, बॅक कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.