रिटेवाडी उपसा सिंचनसाठी स्वतंत्र बैठक हवी! विविध रस्त्यांच्या प्रश्नांचे  एकनाथ शिंदेंना निवेदन - Saptahik Sandesh

रिटेवाडी उपसा सिंचनसाठी स्वतंत्र बैठक हवी! विविध रस्त्यांच्या प्रश्नांचे  एकनाथ शिंदेंना निवेदन

करमाळा(दि.१८): रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत स्वतः बैठक लावावी तसेच करमाळा मतदारसंघातील विविध रस्त्याच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागातून तातडीने आर्थिक तरतुद केली जावी अशा प्रकारच्या  मागणीचे निवेदन मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व बागल गटाचे  नेते दिग्विजय बागल यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेत दिले.

याबाबत अधिक माहिती देताना बागल म्हणाले की, रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी जलसंपदा मंत्र्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात यावी तसेच खालील रस्त्यांना आर्थिक निधी मिळावा अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  या सर्व मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे श्री.बागल यांनी सांगितले.

  • बिटरगाव (सांगवी) ते राष्ट्रीय महामार्ग 141 ग्रा मा 201
  • उंदरगाव ते रिटेवाडी जोडरस्ता ग्रा मा 15
  • कोर्टी ते मांजरगाव रस्ता इ जि मा 78
  • वांगी नं ३ ते आदिनाथ कारखाना ग्रा मा 198
  • कंदर दहिवली रोड ते अर्जुन भगवान माने वस्ती ग्रा मा 242
  • मांजरगाव ते राजुरी ग्रा मा 70
  • त्याचबरोबर करमाळा नगरपरिषद हद्दीतील खालील रस्ते कामांसाठी देखील प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मा मंत्रीमहोदयांकडे केली.
  • दत्तमंदिर (विकासनगर) ते शासकीय विश्रामगृह रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे.
  • शासकीय विश्रामगृह ते केतुर नाका (नगर पालिका) रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे.
  • किल्ला गेट ते टिळक चौक रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे.
  • कुंभारवाडा पूल ते कत्तलखाना रोड ते नालबंद मंगल कार्यालय रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे.
  • करमाळा नगर परिषद येथिल महावीर उद्यान दुरुस्तीसाठी भरीव आर्थिक तरतुद करणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!