‘जुनी पेन्शन लागू करावी’ या मागणीचे ना.भरणे व सभापती शिंदे यांना निवेदन

करमाळा(दि.२४) : १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी व शिक्षकांच्या इतर विविध प्रश्नांबाबत जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने काल रविवारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांना तर शनिवारी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष २००५-०६ मधील शिक्षण सेवक सरळसेवा भरती प्रक्रियेतील दोन्ही जाहिराती स्वतंत्र नसून त्या एकमेकांशी संलग्न असलेने त्या दोन्ही जाहिरातीमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, आणि सातव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीतील (चटोपाध्याय) त्रुटी निराकरण करण्यात आदी मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव, मधुकर शिंदे, हरीश कडू, महेश होणंकळसे, किरण शिंदे, विक्रम राऊत उपस्थित होते.






