रमजान ईदची अंगणवाडीला देखील सुट्टी जाहीर करावी – जमीर सय्यद

करमाळा(दि.२४) : येत्या ३१ मार्च रोजी रमजान ईद हा सण संपूर्ण भारतात साजरा होत असून रमजान ईद निमित्त सर्व शासकीय विभागांना सुट्टी असताना अंगणवाडी शाळेस सुट्टी दिलेली नाही. याबाबतची नाराजी अंगणवाडी सेविकामध्ये व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आहे. रमजान ईद दिवशी अंगणवाडी शाळेला शासनाने सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करमाळा शहर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद यांनी केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, रमजान ईद हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण आहे या दिवशी शासनाच्या सर्व विभागांना सुट्ट्या असून असताना देखील अंगणवाडी ला सुट्टी जाहीर केलेली नाही यामुळे मुस्लिम समाजातील लहान मुलांना शाळेत जावे लागणार आहे अनेक महिला मुस्लिम महिला भगिनी या अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून काम करत आहेत त्यांना देखील सण सोडून कर्तव्यावर रुजू व्हावे लागणार आहे त्यामुळे शासनाने अंगणवाडीला देखील सुट्टी जाहीर करावी. याबाबत आपण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे तसेच जिल्हाधिकारी,महिला व बाल कल्याण विकास अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले.
यावेळी जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख,जहाँगीर बेग, इम्तियाज पठाण , मुस्तकीम पठाण ,शाहीद बेग , कलीम शेख, जहाँगीर शेख , शोएब बेग, कलिम शेख, आरिफ पठाण, आलीम पठाण,सोयल पठाण , उपस्थित होते.





