प्रथमेश साखरे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : डॉ.दुरंदे गुरुकुल कोर्टी (ता.करमाळा) या शाळेतील विद्यार्थी प्रथमेश सुदाम साखरे याची पोखरापूर (ता.मोहोळ) येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धापरिक्षांमध्ये सहभागी होत असतात, त्याप्रमाणे प्रथमेश ने या जवाहर नवोदय विद्यालयासाठी परीक्षा दिली, यात त्याला यश आले आहे.
त्याच्या या निवडीबद्दल डॉ.दुरंदे गुरुकुल या शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे, मुख्याध्यापक चारुशीला जाधव, शिक्षक व मार्गदर्शक यांनी अभिनंदन केले आहे.