नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक किशोर भागवत यांची आत्महत्या - करमाळा शहरात खळबळ - Saptahik Sandesh

नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक किशोर भागवत यांची आत्महत्या – करमाळा शहरात खळबळ

किशोर भागवत

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा (ता.11) : करमाळा शहरातील नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक किशोर भागवत (वय – ४८) यांनी पोफळज (ता.करमाळा) येथील रेल्वे रूळावर आत्महत्या (suicide) केली आहे. हा प्रकार आज (ता.११) पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे. भागवत यांच्या खिशातील एटीएम कार्ड व मोबाईलवरून त्यांची ओळख पटली आहे. किशोर भागवत (kishor bhagwat) करमाळा नगरपरिषदे नगरपरिषदेच्या मुलामुलींची शाळा नं ४ चे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पत्नी माया भागवत या सिताबाई परदेशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. भागवत यांनी मोटारसायकल बाजूला लावून रेल्वेरूळावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यात जोराच्या धडकेत त्यांचा चेहरा उध्वस्त झाला असून पाय तुटलेला आहे. त्यामुळे त्यांना ओळखणे तसे कठीण गेले परंतू जवळील वस्तूवरून त्यांची ओळख पटली आहे. ही घटना करमाळा ( karmala) शहरात कळताच एकच खळबळ उडाली आहे. भागवत यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. (Saptahik Sandesh news)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!