केमच्या तन्मय गावडेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
केम (प्रतिनिधी -संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयातील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी तन्मय रामचंद्र गावडे याची केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी नुकतीच निवड झाली.
तन्मय गावडेच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या या यशाबद्दल तन्मयचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे शाळेच्या संस्थेचे उपाध्यक्ष महेश तळेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर व श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.