प्रगतशील बागायतदार यशवंत पठाडे यांचे निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पोथरे (ता. करमाळा) येथील जुन्या काळातील प्रगतशील बागायतदार यशवंत बाबूराव पठाडे (वय ९६ ) यांचे वृध्दपकाळाने राहत्या घरी आज (ता. १२) दुपारी अडीच वाजता निधन झाले आहे. त्यांचे मागे एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
जुन्या काळात पठाडे हे शंभर एकर जमीनीचे मालक होते. त्यांचेकडे बारा बैलाचा बारदाणा तसेच जुन्या काळातील इंजिन, पुढे ट्रॅक्टरही घेतला होता. त्या काळातील गावातील प्रतिष्ठीत व श्रीमंत व्यक्ती होते. आजपर्यंत प्रकृती ठणठणीत होती. परंतू वृध्दपकाळाने त्यांचे अचानक निधन झाले. मृदुंगाचार्य व पत्रकार नानासाहेब पठाडे यांचे ते आजोबा होते. त्यांच्या निधनाने पोथरे परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी सहा वाजता पोथरे येथे त्यांचे शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.