तानाजी (भाऊ) जाधव यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद व कौतुकास्पद : डॉ. चंद्रकांत पांडव - Saptahik Sandesh

तानाजी (भाऊ) जाधव यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद व कौतुकास्पद : डॉ. चंद्रकांत पांडव

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : टायगर ग्रुपचे संस्थापक तानाजी (भाऊ) जाधव यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे सामाजिक कामासाठी टायगर ग्रुपला देशाबरोबर परदेशातूनही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू; असे आश्वासन पद्मश्री पुरस्कार विजेते, आयोडीन मॅन ऑफ इंडिया तसेच WHO (दिल्ली) चे मुख्य सल्लागार डॉ.चंद्रकांत पांडव यांनी दिले आहे.

Adverties

टायगर ग्रुपचे (tiger group) संस्थापक तानाजी जाधव (tanaji bhau jadhav) यांना डॉ. पांडव यांनी दिल्ली येथे बोलावून घेऊन त्यांच्या कामाचे कौतूक करून सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ.पांडव म्हणाले, की महाराष्ट्रात तानाजी जाधव यांचे कार्य सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. त्यांनी पुरग्रस्तांना भरपूर मदत केली आहे. तसेच रक्तदान शिबीराबरोबर अनेक गोरगरीबांना मदत केली आहे. त्यांना मानणारा तरूण वर्ग मोठा आहे. त्यांच्या या कामाला मदत होणे गरजेचे असून त्यांचे काम देशाबरोबर जागतिक पातळीवर पाठविणे गरजेचे आहे. आरोग्य, शैक्षणिक कामाबरोबरच अन्य सामाजिक कामासाठी जागतिक पातळीवरील मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे करमाळा तालुक्याचे नांव जागतिक पातळीवर ठळक अक्षरात उमटेल. त्यांच्या या कामाची दखल घेऊन तानाजी जाधव यांना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी भारत सरकारकडे मागणी करणार असल्याचेही डॉ. पांडव यांनी सांगितले.

(saptahik sandesh news)

या बैठकीला मेडिकल सायन्सचे व I.I.C. चे मेंबर डॉ. बी. आर. पाटील, पॅरा कमांडो अनिल पाटील यांचेसह मनसेचे शहरप्रमुख नानासाहेब मोरे, ईश्वर साने, आकीब सय्यद, सागर इंगोले, सूरज त्रिभुवन आदी उपस्थित होते.

डॉ.चंद्रकांत पांडव हे करमाळा तालुक्यातील आहेत. त्यांनी टायगर ग्रुपच्या कामाची दखल घेऊन आम्हाला दिल्लीत बोलावून सन्मान केला. तसेच भविष्यातील सामाजिक कामासाठी मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ. पांडव यांना करमाळा येथे आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करू. …तानाजी (भाऊ) जाधव

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!