नगरपालिका निवडणूकीसाठी बागल गट संपूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार : दिग्विजय बागल - Saptahik Sandesh

नगरपालिका निवडणूकीसाठी बागल गट संपूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार : दिग्विजय बागल

दिग्विजय बागल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Karmala Nagar Parishad) यावेळी सत्तापरिवर्तन अटळ असून त्याकरीता बागल गट संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. यावेळी निश्चितपणे करमाळा नगर पालिकेची निवडणूक जिंकू; असा आत्मविश्वास मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांनी व्यक्त केला.

Adverties

करमाळा शहरातील बागल संपर्क कार्यालयात करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागल गटाचे सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.बागल बोलत होते. याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे (Vilasrao Ghumare) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

S.K. collection

यावेळी विलासराव घुमरे म्हणाले की, इच्छुक सर्व उमेदवार व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातून निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागले पाहिजे, बागल गट संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. गाफील न राहता प्रत्येक नगरसेवक व कार्यकर्त्याने आपल्या बागल गटाचा विकासाचा कार्यक्रम सर्व प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचावावा. सत्तापरिवर्तन करून करमाळा शहराचा विकास कसा करता येईल; यासाठी गट-तट, रुसवे-फुगवे दूर करून सर्वांनी आपल्या बागल नेत्या रश्मीदिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ही पालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून आपण जिंकणार आहोत; असा आत्मविश्वास व्यक्त केला.

Sonaraj metal and crockery

यावेळी दिग्विजय बागल म्हणाले की, करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून करमाळा नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य नागरीकांची कामे, शहराचा विकास, रस्ते, पाणीपुरवठा इ. सुविधा देण्यासाठी करमाळा नगर परिषद निवडणुकीला (karmala nagar parishad Election) बागल गट सामोरा जाणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी बागल गट सक्षम आहे. करमाळा शहराची अवस्था पाहिलीतर शहराला आधुनिक विकसित रूप देण्याकरीता शहराच्या चारही बाजूंचे रस्ते, शहराला जोडणारे चारही दिशांचे रस्ते सुशोभित करणे, भुमिगत गटारी (अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम), प्रत्येक गल्ली, वॉर्ड मधील शेवटच्या घरापर्यंत पोहचवणारे रस्ते, दिवाबत्तीची सुविधा, स्वच्छता इ. गोष्टींबाबतचे विकासाचे धोरण घेऊन बागल गट पूर्ण ताकदीने न.पा. निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

Sonali ply and furniture
Sonali ply and furniture shop karmala advertise

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!