विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात काम करावे : प्रा.प्रसाद चौधरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे, तेथे मेहनत करून काम करावे, जागतिक पातळीवर देशाचे नाव झळकवावे, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:मध्ये देशभक्ती रुजवावी आणि आपल्या कृतीतून ती दाखवून द्यावी, असे प्रतिपादन सी मेट पुणे येथील कनिष्ठ शास्त्रज्ञ प्रा.प्रसाद चौधरी यांनी केले.
कोर्टी (ता.करमाळा) येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. सन.२०२१/२२ मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या वतीने प्रथम क्रमांक आलेल्या तीन विद्यार्थिनींना ट्राँफी देण्यात आली.तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने गोल्ड मेडल व ट्राँफी देण्यात आली.तसेच प्रथम क्रमांक ऋतुजा लक्ष्मण अनारसे रु.३ हजार रु ,त्रिवेणी किसन वाघमारे रु.२ हजार ,तर तनुजा अभंग हिस रु १ हजार असे प्रथम,द्वितीय, व त्रुतीय अशा क्रमांकाना बक्षिसे देण्यात आली.
ही बक्षिसे या पुढेही दिली जातील असे मत यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश अभंग होते.प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण -शिंदे यांनी केले .सुत्रसंचालन आबासाहेब कारंडे यांनी केले तर आभार बाळासाहेब भिसे यांनी मानले.कार्यक्रमाला सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिपक चव्हाण, शा.व्य.स.अध्यक्ष बापु साहेब शिंदे, ,दुरगुडे,लक्ष्मण अनारसे,रंगनाथ अभंग,किसन वाघमारे, अलका वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे ठाकर,शिवम शिंदे,विदयार्थीनी ऐश्वर्या हुलगे ,नेहा जाधव यांनी परिश्रम घेतले.