२३ जुलै रोजी वाशिंबे येथे रक्तदान व नेत्ररोग निदान शिबीराचे आयोजन
करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : स्व. ज्ञानदेव जगन्नाथ भोईटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान व नेत्ररोग निदान शिबीराचे येत्या २३ जुलै रोजी वाशिंबे (ता.करमाळा) येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख नेत्ररोग तज्ञ व हृदय रोग तज्ञ उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती स्व.जगन्नाथ भोईटे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली आहे.
याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वाशिंबे गावात २५१ विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे येथे सकाळी ८ वा. होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिन भोईटे यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी नारायण आबा पाटील(माजी आमदार करमाळा),रामदास झोळ ( दत्तकला शिक्षण संस्था, भिगवण), पांडुरंग सुरवसे ( दैनिक कटूसत्य) समीर माने ( तहसिलदार करमाळा), अतुल भाऊ पाटील (सभापती करमाळा), मनोज राऊत ( गटविकास अधिकारी करमाळा) सौ.ज्योतीताई टापरे ( उपसरपंच वाशिंबे) डॉ. सुदर्शन नवनाथ झोळ,मा. श्री. सुर्यकांत कोकणे (पोलिस निरिक्षक, करमाळा), मा. श्री. डॉ. अमोल डुकरे ( उपजिल्हा रु. करमाळा), सौ. मनिषाताई नवनाथ झोळ (लोकनियुक्त सरपंच वाशिंबे),श्री. डॉ. संजय साळुंके ( तालुका आरोग्य अधिकारी करमाळा),मा. श्री. गणेश करे-पाटील ( अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था) डॉ. भोंडवे एस. बी.(तालुका आरोग्य अधिकारी),डॉ. हेमंत येवगे (वै. अधि.प्रा. केंद्र कोर्टी),डॉ. गौरी अनुरथ झोळ (M.B.B.S- वाशिंबे),श्री. डॉ. रोहन पाटील ( हृदयरोग तज्ञ करमाळा),श्री. डॉ. विक्रम नाळे ( वाशिंबे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.