दत्त पेठ तरुण मंडळाचा दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडला - Saptahik Sandesh

दत्त पेठ तरुण मंडळाचा दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडला

करमाळा : शहरातील दत्त पेठ तरुण मंडळ यावर्षीचा दहीहंडी उत्सव फार मोठ्या उत्साहात पार पडला.

या दहीहंडी महोत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी श्री देवीचामाळ येथील श्रीमंत राजे रावरंभा तरुण मंडळ गोविंदा पथक,मंगळवार पेठ येथील गोविंदा पथक, रुपचंद तालीम गोविंदा पथक यांच्यासह इतर अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला होता. बऱ्याच गोविंदा पथकांनी तीन ते चार थर लावण्यात यशस्वी झाले होते. परंतु दहीहंडी फोडण्याचा मान यावेळी श्रीमंत राजे रावरंभा तरुण मंडळ देवीचा माळ या गोविंदा पथकाला मिळाला. यानंतर विजेत्या गोविंदा पथकाला दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने ट्रॉफी व बक्षीस रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी
दोस्ती बेंजो पथकाने आपल्या सुमधुर संगिताने दहीहंडी कार्यक्रमात रंग भरला होता.

या दहीहंडी उत्सवात युवा नेते शंभूराजे जगताप, टायगर ग्रुप चे डॉ. तानाजीभाऊ जाधव,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत,ऍड. कमलाकरजी वीर, भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे,नगरसेवक सचिन घोलप, सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड, पत्रकार वाघमारे, पत्रकार मडके, इंजि. राजेंद्र परदेशी, महेशजी सोरटे (सरपंच देवीचामाळ), विनय ननवरे, अशपाक जमादार यांचेसह अनेक मान्यवरांनी यावेळी भेटी देऊन दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवला. यावेळी पोलीस स्टेशन, करमाळा यांनी सहकार्य करून चोख बंदोबस्त ठेवला.

दत्त पेठ तरुण मंडळातील कार्यकर्त्यांच्या हस्ते सर्व सन्माननीय अतिथीचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अरुण तांगडे, चरण परदेशी, संग्राम देशमुख, भूषण खुळे,छोटू परदेशी, अभयजी महाजन,धनंजय महाजन,रामा तांगडे, सचिन भणगे,ओंकार चोपडे,अभि भणगे,दत्ता काटकर सतीश फंड,अजिंक्य महाजन नितेश देवी,घोडेगावकर आदींनी भरपूर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला. या उत्सवात शहरातील अनेक राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील महिला पुरुषांनी दहीहंडी पाहण्यासाठी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमात भैरवनाथ शुगरचे चेअरमन किरण सावंत, तसेच गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, नगरसेवक अमोल परदेशी, तालुका शिवसेना प्रमुख सुधाकर लावंड, मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन दत्ता काटकर यांनी केले. शेवटी ऍड. संकेत खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!