सावली देणारे परत फेडीची अपेक्षा कधीच करत नाहीत - Saptahik Sandesh

सावली देणारे परत फेडीची अपेक्षा कधीच करत नाहीत

आई वडील ग्रेट असतात…. त्यांना जपा….. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवा…. ते आहेत म्हणुन आपण असतो…. जीव लावा. आपण लहान होतो तेव्हापासुन आजपर्यंत ते आपल्या साठी काबाडकष्ट करत असतात…. केवळ आपली अपत्ये सुखी रहावीत म्हणुन.. आपण ही त्यांना साथ देऊन चांगले कार्य करून त्यांच्या कष्टा चे चीज करावे. चांगले दिवस लवकर आणावेत… प्रत्येकाचे आयुष्य लिमिटेड आहे…. आहे तोपर्यंतच जे काही चांगले करता येईल ते करा..हा जन्म पुन्हा नाही.

आयुष्यात 3 phase समजता येतील. 0 – 25, 25 – 50, 50- 75 or 75± आई वडील, आपण, आपली मुले… असे तिघे 1,1 phase ne मागे असतात. आपण जेव्हा phase 1 मध्ये असतो तेव्हा आई वडील phase 2 मध्ये तर आपण जेव्हा phase 2 मध्ये जातो तेव्हा आई वडील phase 3 मध्ये जातात आणि तेव्हा आई वडीलांच्या नातवांची एंट्री phase 1 मध्ये होते.

आपल्या Phase 1 मध्ये आई वडीलांनी जसे आपल्याला लहान बाळा प्रमाणे सांभाळलेले असते तसे आपण आई वडील यांना त्यांच्या phase 3 मध्ये सांभाळायचे असते.

असेच आपल्या कुटुंबाची काळजी करणारी अनेक नाती असतात… आजी, आजोबा,.. भाऊ बहीण… काका मावशी… मामा मामी, चुलते….. असे अनेक वडिलधारे … प्रत्येकजण आपापल्या टाइम phase मध्ये लहानाचा मोठा होतो त्यामुळे एकाच वेळी आपल्याला अनेक रोल करावे लागु शकतात… (स्टार्ट to end) …

यापुढे मित्र मंडळी आणि शिक्षक, समाजातील अनेकजण जीवनात बरेच काही देतात….ज्यांच्यामुळे आपण घडतो… सर्वांची आठवण ठेवावी. आपण ही सर्वांचे, समाजाचे देणे लागतो हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. चांगल्या सवयी ठेवल्या पाहिजेत. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

सर्व नाती सांभाळून सर्वांची काळजी घ्यावी. नाहीतर मग शेवटी regret लिहावी लागतात… मी असे करायला पाहिजे होते.. हे करायचे राहून गेले.. आयुष्यात याला (जसे की पैसा) अवास्तव महत्त्व दिले. आयुष्याच्या शेवटी पैश्या पेक्षा नातेसंबंध, कुटुंबाचे प्रेम, यशस्वी पणे पार पाडलेल्या सर्व जबाबदार्‍या, समाजासाठी गरजू लोकांसाठी केलेली मदत महत्त्वाची ठरते.

  • प्रा. दिलीप गुलाबराव पाटील, भोसे ता. करमाळा, मो. 8275458541

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!