विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या तिघा जणांविरूध्द गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : माहेराहून पैसे घेऊन ये.. या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघा जणांविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता उंदरगाव (ता. करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी माधुरी संतोष कांबळे (रा. उंदरगाव) या विवाहितेने फिर्याद दिली आहे.
त्यात तिने म्हटले आहे, की सन २०१८ मध्ये माझे पती संतोष अंबादास कांबळे याच्याबरोबर लग्न झाले आहे. मला दोन मुली आहेत. असे असूनही माझे पती खानवटा येथे ग्रामसेवक म्हणून काम करतात. माझे पती संतोष कांबळे, सासरे अंबादास कांबळे, नणंद रोहिणी हनुमंत वाघमारे हे माहेराहून प्लॉट घेण्यासाठी पैसे घेऊन ये.. म्हणून व तुला मुलीच आहेत, मुलगा होत नाही म्हणून जाचहाट करतात.
२८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री साडेनऊ वाजता माझ्या पतीने लाकडी काठीने माझ्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारून फॅक्चर करून शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी १२ सप्टेंबरला या तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.