केडगाव येथे हातभट्टी दारू पकडली - Saptahik Sandesh

केडगाव येथे हातभट्टी दारू पकडली

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : केडगाव (ता. करमाळा) येथे बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्यास रंगेहाथ पकडले असून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता घडला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार कल्याण त्रिंबक फरतडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की केडगाव येथे बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्यावर आम्ही छापा टाकला असता, सुभाष सुरेश पवार हा आपले राहत्या घराच्या बाजूस आडोशाला बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे एक हजार रू. किंमतीची २० लिटर हातभट्टी दारू सापडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!