बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर रावगाव मध्ये कारवाई - Saptahik Sandesh

बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर रावगाव मध्ये कारवाई

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रावगाव (ता. करमाळा) येथे बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार १२ सप्टेंबरला दुपारी सव्वाबारा वाजता घडला आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल आकाश अनिल भोजने यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की रावगाव येथे बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्यावर डुकरेवाडी येथे अभिजीत खतीम पवार (रा. रावगाव) हा पत्राशेडच्या बाजूला हातभट्टी दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडे ७५० रूपयाची १५ लिटर हातभट्टी दारू सापडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!