अंजनडोह येथे चोरटयाने घर फोडुन सोन्याची नथ पळविली
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अंजनडोह (ता.करमाळा) येथे अज्ञात चोरटयाने घर फोडुन घरातील सामान अस्ताव्यस्त करून ८ हजार रुपयांची सोन्याची नथ चोरून नेली आहे. हा प्रकार १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी बाळासाहेब दशरथ खंकाळ (रा.अंजनडोह ता.करमाळा जि. सोलापूर सध्या रा शास्त्रीनगर, पवुट रोड कोथरोड पुणे) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, मी व माझा भाउ त्याचे कुटुंबासह पुणे येथे राहण्यास आहे. अंजनडोह येथे शेती आहे. माझे वडील माझे लहान बहीणीच्या ऑपरेशन करीता एक महीन्यापासून अंजनडोह येथुन मुंबई येथे घराला कुलुप लावुन गेले होते.
१५ सप्टेंबरला सकाळी ८:३० वाचे सुमारास मी माझे अंजनडोह येथील माझे मेव्हणे धनंजय जाधव याचा फोन आला व त्याने मला सांगितले की, तुमचे अंजनडोह येथील राहते घराचा दरवाज्या उघडा असुन मी व तुझे चुलते हनुमंत खंकाळ, महादेव रणदिवे,राजेन्द सरतापे, असे घरात जावुन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्तवस्त पडले होते. त्यानंतर मी त्याच दिवशी १५ सप्टेंबरला रात्री ११:३० वा. सुमारास अंजनडोह येथे मुळ गावी आलो.
घरी येवुन पाहिले तेव्हा घरात जावुन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्तवस्त पडले.मी वडीलांना घडल्या प्रकाराबाबत सांगितले असता मला माझे वडीलांनी सांगितले की, घरात कपाटात सोने आहे. मी घरातील कपाटात सोने आहे का ते पाहिले असता कपाटातील सव सामान अस्तवस्त पडले पडले होते. कपाटात सोने नव्हते. त्यावेळी माझी खात्री पटली की माझे घराच्या दरवाज्याचे कुलुप हे कशाचे तरी साह्याने तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे घरफोडुन त्यातील ८०००/- रू ३ ग्रमची सोन्याची नथ चोरून नेली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.