नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयात केमिकल मुक्त शेतीविषयी मार्गदर्शन पर शिबिर संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करमाळा शहरातील नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय आणि श्री सद्गुरू हर्बल शॉप करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यापक विद्यालय येथे आरोग्या संदर्भात तसेच केमिकल मुक्त शेतीविषयी मार्गदर्शन पर शिबिर घेण्यात आले. तसेच त्या संदर्भात प्रात्यक्षिक ही दाखविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद फंड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. गजानन ननवरे आणि रेश्मा जाधव या उपस्थित होत्या.
आरोग्य विषयी पुढे बोलताना रेशमा जाधव म्हणाल्या की,आरोग्य म्हणजे स्थूल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक, संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक, दृष्ट्या सक्षम असते, ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थ्याचा मुख्य निकस आहे. प्रत्येकाने आपल्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. असेही त्यांनी म्हटले आहे.
तुलसी, एलोवेरा ज्यूस, लिव्ह केअर सिरप, गोमूत्र, डेटॉक्स फूट पॅच, राईस ब्रान ऑइल इत्यादी आयुर्वेदिक औषधाबद्दल त्यांनी माहिती देऊन त्याचे डेमो देखील दाखविण्यात आले. यावेळी प्रा भारत फंड, प्रा. शेख, प्रा नरारे, प्रा शिंदे, प्रा पाटील, प्रा चौधरी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा जाधव यांनी तर आभार वैभवी जाधव यांनी मानले.