भारत जोडो यात्रेमुळे संपुर्ण देशात काँग्रेसमय वातावरण - प्रतापराव जगताप - Saptahik Sandesh

भारत जोडो यात्रेमुळे संपुर्ण देशात काँग्रेसमय वातावरण – प्रतापराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : – अखिल भारतीय काँग्रेस आयचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्या “भारत जोडो” यात्रेमुळे संपुर्ण देशात काँग्रेसमय वातावरण तयार होत असल्याचे प्रतिपादन करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले.

पाडळी (ता.करमाळा) येथील शाखेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना श्री.जगताप म्हणाले कि, सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो पदयात्रा सुरु असुन वेगवेगळ्या राज्यातुन सदर पदयात्रा जाणार असल्याचे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

येणाऱ्या काळात जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय असुन जनतेलाही आता बदल हवा आहे.येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातही काँग्रेस पक्षाला नक्कीच चांगले दिवस येणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.सध्या पाळीव प्राण्यांमध्ये लंपी नावाच्या रोगाने थैमान माजवले असल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असुन त्यासाठी सर्व शेतकरी बंधुनी उपलब्ध असलेल्या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जगताप यांनी केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, सुजय जगताप, उत्तरेश्वर सावंत,नितीन चोपडे,उपस्थित होते.यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायकर,शाखा उपाध्यक्ष शाम जगताप,खजिनदार किरण वायकर,सचिव हसन मुलाणी,सहखजिनदार आप्पा जगताप,सहसचिव शिवाजी जगताप यांनी मनोज दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे नियोजन केले होते.यावेळी शाखेच्या वतीने प्रतापराव जगताप यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील अनेक युवक व जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

Congress atmosphere in the whole country due to Bharat Jodo Yatra – Prataprao Jagtap | Karmala News| Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!