कमलाई प्रतिष्ठाणमार्फत मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्रीदेवीचामाळ येथील कमलाई प्रतिष्ठाणमार्फत श्रीदेवीचामाळ येथील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. तसेच याच शाळेसाठी दोन डस्टबीन भेट म्हणून देण्यात आले.
कमलाई प्रतिष्ठानमार्फत गणेशोत्सवमध्ये महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते, गणेशोत्सवातील वायफट डीजे , बँड या वरती खर्च न करता प्रत्येक वर्षी सामाजिक कार्य कमलाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून केले जाते. मूकबधिर विद्यालयात मिष्टान्न भोजन कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक कमलाई प्रतिष्ठाण चे सदस्य पवन सोरटे, आशिष पुजारी, कृष्णा पवार, ऋषी पवार, पवन सुर्यपूजारी, सार्थक पाटील, प्रवीण जगताप,प्रथमेश सोरटे,श्रीवेध गंधे, श्रेयस सुर्यपूजारी, आदित्य सोरटे, अथर्व सोरटे, कमलेश डबडे,
पै.अक्षय थोरबोले, शंभो जगताप, सज्जन सोरटे, विनायक भोसले,ऋषिकेश सोरटे,सागर चव्हाण, ऋषिकेश सुर्यपूजारी,स्वराज पाटील, अविनाश सावंत,महेश पवार, सुदर्शन भोसले, अथर्व थोरबोले,परशु जगताप,अमीर शेख,केतन जगताप,अजरुद्दीन शेख,रोहित बिडवे,सुमित मोरे,शंभू पवार,जयदीप पुजारी,वैभव बगडे,प्रतीक थोरबोले,बापू भोसले मयूर गायकवाड तसेच कमलाई प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य उपस्थित होते. कमलाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून दरवर्षीच्या सामाजिक उपक्रमामुळे अनेकांनी कौतुक केले.