२४ ते २६ सप्टेंबरला फिरते लोकअदालत
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुका विधी सेवा समितीच्या वतीने २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत फिरते लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे; अशी माहिती विधी सेवा समितीच्या अध्यक्षा न्यायाधीश एम.पी.एखे यांनी दिली.
या कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबरला पोथरे व २५ सप्टेंबरला बोरगाव येथे सकाळी साडेआठ वाजता शिबीर घेण्यात येणार आहे. यावेळी कामोणे, बिटरगाव श्री, आळजापूर, पोटेगाव, बाळेवाडी, तरटगाव, पाडळी, घारगाव या गावात जनजागृतीपर पत्रक वाटप केले जाणार आहेत.
२५ सप्टेंबरला बोरगाव येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने कायदेविषयक शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात ॲड.वाय. एच. पठाण यांचे महिलाविषयीचे कायदे, ॲड. आर. एस. सावंत यांचे रस्ता केस विषयीची माहिती, ॲड.एन.बी. राखुंडे यांचे वाहतुकीचे नियम, ॲड.के.व्ही.वीर यांचे मध्यस्थी / लोकअदालत या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश सौ.एम.पी.एखे हे राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ड. व्ही.ए.जरांडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, तहसीलदार समीर माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
२६ सप्टेंबरला जेऊर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी साडेदहा वाजता फिरते लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या फिरते लोकअदालतचा लाभ तालुक्यातील नागरीकांनी घ्यावा; असे आवाहन तालुका विधी सेवा समिती व करमाळा वकिल संघाच्या वतीने करण्यात आले आहे.