केत्तूर येथे देशी दारू पकडली – ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत कारवाई
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.26) : केत्तूर नं.-2 येथे देशी दारू पकडली आहे. ही ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यात पोलीस काॅन्स्टेबल ज्योतीराम अंगद बारकुंड यांनी फिर्याद दिली आहे. त्यातत्यांनी म्हटले की ऑपरेशन परिवर्तन अनुषंगाने जिंती दुरक्षेत्र हद्दीत 26 सप्टेंबरला दुपारी 12-30 वाजता पेट्रोलिंग करीत असताना मौजे केत्तुर नं. 02 गावाजवळ आलो असता तेथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला राजेंद्र रामचंद्र खटके (वय-33, रा. केत्तुर नं.2 ) हा इसम चोरून देशी व विदेशी दारूची विक्री करीत होता. तो पांढरे रंगाची पिशवी घेऊन बसलेला दिसला. त्याची पिशवी तपासुन पाहता त्यात 2035/-रू. किं.च्या एक 11 टुबर्ग नावाचे कंपनीच्या बियरच्या बाटल्या सापडल्या.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.