केम-तुळजापूर एसटीचे केम ग्रामस्थांच्या वतीने भर पावसात स्वागत - Saptahik Sandesh

केम-तुळजापूर एसटीचे केम ग्रामस्थांच्या वतीने भर पावसात स्वागत

केम (प्रतिनिधी – संजय जाधव ): आज (दि.२६) नव्याने सुरु झालेल्या केम-तुळजापूर एसटीचे केम ग्रामस्थांच्या वतीने भर पावसात मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.

कुर्डुवाडी आगाराने घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज पासून केम तुळजापूर एसटी सुरू करून केम येथील प्रवाशांना नवरात्रात भेट दिली आहे. त्याबद्दल कुर्डुवाडी आगाराचे आगारप्रमुख श्री. राठोड व वाहन निरीक्षक श्री. हांडे यांचे आभार मानले. आज सकाळी ९ वा, या एसटिचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी या गाडीचे चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर, भाजपाचे तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, सामजिक कार्यकर्ते सचिन श्रृंगारे, कुंकू कारखानदार राजेंद्र गोडसे कुबेर तळेकर, सुनिल नागणे एन डि,जाधव सर राजेंद्र कांबळे राजेंद्र भिताडे आदिजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!