करमाळा तालुक्यातील दोन पुरुष बेपत्ता…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील वांगी नं १ व चिखलठाण नं १ येथील असे दोन पुरूष बेपत्ता झाले आहेत. यामध्ये वांगी नं १ (ता.करमाळा) येथील सुरज बाळू भोसले (वय ४३) २३ सप्टेंबरपासून घरातून निघून गेले आहेत, अद्याप ते बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी करमाळा पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
तसेच चिखलठाण नं १ (ता.करमाळा) येथील मल्हारी त्रिंबक कवितके (वय ४०) हे २० सप्टेंबरपासून घरातून निघून गेले असल्याने त्यांच्या पत्नीने करमाळा पोलिसात तक्रार
दाखल झाली आहे. या दोन्ही प्रकरणी करमाळा पोलिसांनी मिसिंग दाखल केले असून पुढे तपास सुरु आहे.