पत्रकार संघाच्या कार्यालयात चोरी – करमाळा पोलिसांनी 4 संशयीत व्यक्तींना घेतले ताब्यात…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील पत्रकार संघाच्या कार्यालयात बुधवारी (ता.१९) मध्यरात्री कार्यालयाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील एलएडी टीव्हीसह संगणक आदी असे ४६ हजारांचा मुद्देमाला पळवून नेला आहे. करमाळा पोलिसांनी माहितीच्या आधारे तपास करून ४ संशयीतांना ४६ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
सदर चोरट्यानी मौज मजेसाठी लागणाऱ्या पैशाकरीता चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. या ताब्यात घेतलेल्या संशयीतांनी यापूर्वीही अशा चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी महेश नरसिंह चिवटे वय 45 वर्षे धंदा व्यापार/पत्रकार रा. श्री देवीचामाळ रोड कृष्ण्णाजी नगर, करमाळा यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनीम्हटले की, आमचे करमाळा शहरात सर्व पत्रकार यांचे मिळुन शहरातील जिन मैदान करमाळा येथे पत्रकार कार्यालय आहे. ते दररोज सकाळी 09:00 वा चालु करुन रात्रौ 09:00 वा बंद करीत असतो, १८ ऑक्टोबर रोजी आम्ही नेहमी प्रमाणे आमचे पत्रकार कार्यालय मध्ये कामे करुन रात्रौ 09:00 वा चे सुमारास आमचे ऑफीस बंद केले होते. त्यानंतर मी दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी 09:00 वाचे सुमारास ऑफीस चालु करण्यासाठी गेलो असता आमचे ऑफीसचे शटरचे कुलुप तोडले दिसले. त्यावेळी मी आमचे ऑफीस आत मध्ये प्रवेश केला असता आमचे ऑफीस मधील सामान अस्थाव्यस्त पडले दिसले. तेव्हा माझी खात्री झाली की, आमचे ऑफीसचे शटरचे कुलुप तोडुन आत मध्ये प्रवेश करुन चोरी केली आहे.
खालीलप्रमाणे कार्यालयातील वस्तू चोरीला गेल्या आहेत 1) 25,000 /- एक LED HAIYER कंपनीचा मॉडेल नंबर LE 32 D 2000/2019 जुबाकिअं 2) 10,000 /- एक एच सी एल कंपनीचा मॉनिटर कंपनी सिरिअर नं TFT185WBOPSA जुवाकिअं 3) 5,000 /- एक एच सी एल कंपनीचा सी पी ओ सिरीयल नं 411AA862328 जुवाकअि 4) 1000/- एक ORTIS कंपनीचा कीबोड जुवाकिअं. 5) 500/- एक ENTER कंपनीचा माउस
याप्रकरणी आकाश उर्फ बाळा संजय घाडगे (वय २३) फंड गल्ली, अजय उर्फ किशोर घोडके (वय २१) सिद्धार्थ नगर, रोहन नंदकुमार शिंदे (वय २२) रा. सिद्धार्थ नगर, केदार उर्फ मोन्या सुभाष कुसकर (वय १९) फंड गल्ली आदि संशयीत आरोपींची नावे आहेत. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
अशाच प्रकारची चोरी बागवान नगर, मेन रोड वरील जैन मंदिर, दत्त मंदिर अशा ठिकाणी झाली. पण चोर सापडत नव्हते. बुधवारी जीन मैदान येथील संकुलात पत्रकार कट्टा येथील चोरी उघडकीस आल्यानंतर याचा शोध घेण्यात आला. यावेळी काही युवक हे संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन संगणक, एलएडी टीव्ही व इतर साहित्य असा एकूण ४६ हजारांचा ऐवज चोरल्याची कबूली दिली. सदरची कारवाई पोलिस निरिक्षक जोतीराम यांच्या गुंजवटे मार्गदर्शनाखाली हवालदार अजित उबाळे नाईक चंद्रकांत ढवळे, पो. कॉ. तौफिक काझी, अमोल जगताप, सोमनाथ जगताप, सोमनाथ कांबळे, म. पो. कॉ. शितल पवार आदिच्या पथकाने तपास लावला आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार संतोष देवकर हे करीत आहेत.