कै.विनायक फाळके यांचे पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम - पोमलवाडी येथे 70 नागरिकांनी केले रक्तदान.. - Saptahik Sandesh

कै.विनायक फाळके यांचे पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम – पोमलवाडी येथे 70 नागरिकांनी केले रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोमलवाडी (ता.करमाळा) येथिल रहीवाशी कै.विनायक दगडू फाळके यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ह.भ.प.छगन खडके महाराज (प्रति इंदोरीकर) यांचे फुलाचे किर्तन संपन्न झाले. याप्रसंगी कै. विनायक दगडू फाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जि प प्रा शाळा पोमलवाडी यांना व्यासपीठ सप्रेम भेट देण्यात आले, तसेच याप्रसंगी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा बँक मॅनेजर राजेंद्र रणसिंग, ह.भ.प.छगन खडके महाराज (प्रति इंदोरीकर) तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात स्वयंस्फुर्तीने नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी जवळपास 70 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास श्री भगवंत ब्लड बँक सेंटर, बार्शीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, विजय तोडकरी, सुयोग निकम, राधिका बेले, प्रणाली घोंगाणे ,यांनी यशस्वीरीत्या रक्तसंकलन केले.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा बँक मॅनेजर राजेंद्र रणसिंग, उपजिल्हा शिवसेना प्रमुख सुर्यकांत पाटील, केत्तूरचे माजी सरपंच ॲॅड. अजित विघ्ने, सुहास एकाड, संग्राम पाटील,दत्ता काळे, संभाजी भोपते, श्री पोपट फाळके, श्री दत्ता काटे व गौळवाडी, पोमलवाडी ,खातगाव व परिसरातील ग्रामस्थांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी परशुराम विनायक फाळके, राजेंद्र विनायक फाळके , नवनाथ विनायक फाळके व समस्त फाळके परिवाराचेवतीने कोव्हीड मधे विशेष कार्य बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, पोलिस मित्र, आशा वर्कर यांचा ही सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!