चिखलठाण येथील ९ वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता - अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची फिर्याद दाखल - Saptahik Sandesh

चिखलठाण येथील ९ वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता – अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची फिर्याद दाखल

करमाळा /संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथे इयत्ता ९ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन (वय 15 वर्ष 2 महीने) मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमीष दाखवून पळवुन नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार १८ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजता घडला आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, माझी मुलगी ही गावातील विद्यालयात चिखलठाण येथे इयत्ता 9 वी मध्ये शिकत आहे. मुलगा हा रिटेवाडी येथे कामास असतो. गेले चार पाच दिवसापासुन तो तेथे कामास गेला होता दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रात्री 08/30 वा सुमारास मी तसेच माझी पत्नी व मुलगी असे घरी असताना माझी मुलगी मला व माझी पत्नी हीस बाथरूम करीता जाते, म्हणुन बाहेरी गेली, ती परत आली नाही. त्यामुळे मुलीचा इतरत्र व नातेवाईक यांचेकडे चौकशी केली, तसेच तिचे मैत्रिणीकडे विचारपुस केली परंतु ती कोणाकडेही गेली नाही.

माझी मुलगी मोबाईल वापरत नाही. माझे घरातील माझे मुलांचा मोबाईल कोणी नसताना वापरत होती. मी व माझी पत्नी, मुलगा यांनी सर्वत्र शोध घेवुन ती कोठेही आढळुन आली नाही. माझी मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुध्दा तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तिला कोणते तरी अमीष दाखवुन तिला पळवुन नेले बाबत माझी खात्री झाली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी वरील अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!